Home Cities जळगाव माध्यमिक शिक्षकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माध्यमिक शिक्षकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
44

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील माध्यमिक शिक्षकांनी पक्षात प्रवेश घेतला.

जळगाव शहरातील विजयसिंह पाटील, हेमंत सोनार ,सुनील दाभाडे ,सागर पाटील, प्रवीण धनगर, मनोज बावस्कर ,मनोज भालेराव, पांडुरंग पवार ,भीमराव सूर्यवंशी या विविध माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर मध्ये जाहीर प्रवेश केला.

पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक कुमारी दिव्या भोसले, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, महानगर सचिव अ‍ॅड. कुणाल पवार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound