रेकॉर्ड ब्रेक ! : पाणी पुरवठा योजनांचा धडाका; ऐतीहासीक ई-भूमीपुजन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आज जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी संख्येने पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपुजन पार पडले.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील १४८७ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी सुमारे ७०० कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यातील तब्बल १००७ गावांच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशाकीय मान्यता देण्यातआलेली आहे. त्यातील १६८ कोटी ५५ लक्षच्या २२२ गावांचे वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे.. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जिल्ह्यातील २६ गावांमधील पाणी पुरवठा योजनांसाठी ५२८ कोटी ५४ लक्ष रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून यातील १६ गावांच्या ३४८ कोटी ६२ लक्षच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील २८७ कोटी ६७ लक्षच्या१२ योजनांची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील मजीप्रच्या व जिल्हा परिषदेच्या अश्या एकूण ४१६ कोटी निधीतून २३३ पा.पु योजनांचे ई भूमिपूजन ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात भव्य दिमाखदार पद्धतीने संपन्न झाले.

यावेळी बोलताना खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विक्रमी योजना मंजूर करून राज्यात ‘जलदूत’ म्हणून ओळख झाली आहे. जेव्हा जेव्हा विकास कामांमध्ये गुलाब भाऊंना साद घेतली तेव्हा – तेव्हा भाऊंनी विविध कामे मंजूर करून प्रतिसाद दिला. जास्तीत जास्त मनेरेगातून कामे करावी यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले की, ना. गुलाबराव पाटील हे ‘चालते बोलते विकासाचे मंत्री’ आहेत. गुलाब भाऊनी सर्वाधिक शासन निर्णय पाणीपुरवठा विभागाचे झाले असून पालकमंत्री म्हणूनही त्यांचे काम उत्तम आहे. पक्षभेद कधीही केला नाही. पाण्याची बचत करा असे आवाहन त्यांनी केले.

ना. गिरीश महाजन यांनी आपल्या ऑनलाईन मनोगतातून पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या माध्यमातून ना. गुलाबराव पाटील हे करीत असलेल्या कार्याची वाखाणणी केली. ते म्हणाले की, दररोज या खात्याचे नवनवीन जीआर आणि टेंडर्स निघत आहेत. पाणी पुरवठा योजनांच्या पटापट मंजुर्‍या दिल्या जात आहेत. जिल्ह्याचा विचार केला असता बहुतांश गावांना योजना मंजूर करण्यात आल्या असून या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत शुध्द जल पोहचवण्याचा संकल्प हा खर्‍या अर्थाने पूर्णत्वाकडे जाणार असल्याने ना. महाजन म्हणाले.

सर्वांचे सहकार्य आवश्यक : ना. पाटील

यावेळी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण नवीन पाणी पुरवठा योजनांचे उदघाटन करत असतांना आधीच्या योजनांच्या अयशस्वीतेच्या कारणांवरही विचार केला पाहिजे. पाणी पुरवठ्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाण्याचा उदभव आहे. याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. तर ज्या ग्रामपंचायती तयार असतील त्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप प्रदान करण्यात येतील अशी ग्वाही देखील ना. पाटील यांनी दिली. सर्वांच्या सहकार्यानेच योजना यशस्वी होणार असल्याचे प्रतिपादन ना. पाटील यांनी केले.

जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेला पुणे प्रसिद्ध तज्ञ गणेश शिंदे हे ग्रामविकास व स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागाच्या विकासातील सर्वात महत्वाचे घटक असणार्‍या बाबींचे अतिशय मनोवेधक पध्दतीत विवेचन केले. योग्य नियोजन आणि पाणपुराव्याने समग्र ग्रामविकास साधता येत असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेला व जिल्ह्यातील २३३ पाणीपुरवठा योजनांचा ई – भूमीपूजन सोहळ्याला खासदार उन्मेषदादा पाटील , आमदार किशोर दराडे, आमदार संजय सावकारे , आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती तर विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया , म.जी.प्रा.चे अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम , जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे आणि जिल्ह्यातील योजना मंजूर करण्यात आलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, माजी जिल्हा परिषद गोपाल चौधरी, रावसाहेब पाटील, पवन सोनवणे, संजय पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, गजानन पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, पी एम पाटील सर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील, तुषार महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमच्या प्रास्ताविकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांनी जिल्ह्यातील मंजूर पाणीपुरवठा योजनांची सविस्तर माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले तर आभार जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक स्नेहा कुडचे यांनी मानले.

Protected Content