महापरिनिर्वाणदिनी कवि संमेलनातून बाबासाहेबांना अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे महापरिनिर्वाणदिनी कवि संमेलनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे महापरिनिर्वाणदिनी बाहेती महाविद्यालयात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी मुश्ताक करीमी होते. तर याचे उदघाटन व्हीएनआयटी नागपूर येथील प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे यांनी केले. प्रारंभी मनपा शिक्षण सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अनिल लोहार, डॉ. मिलिंद बागुल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे, शिक्षण सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले.

संमेलनाच्या प्रारंभी दिलीप सपकाळे यांनी कविता सादर केली. यानंतर किशोर नेवे, मंगल पाटील, विजय लुल्ले, मीना सैंदाणे, प्रल्हाद खरे, राहुल निकम, प्रकाश पाटील, डॉ. मिलिंद बागुल, मुश्ताक करिमी, दीपमाला बाविस्कर यांनी कविता सादर केल्या. या वेळी शेख नईम बिस्मिल्लाह, सेवानिवृत्त उपअभियंता विजय कुमार मौर्य, अनिल सुरडकर, आर. टी. सोनवणे, सुनील सोनवणे, रमेश सोनवणे, जितेंद्र जावळे, भास्कर चव्हाण, उपप्राचार्य डॉ. डी. वाय. हिवरे, प्रा.राहुल बनसोड, प्रा. नीलेश रामटेके, डॉ. गौतम भालेराव, दत्तू मिस्तरी, राजू पाटील उपस्थित होते. बापू पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय लुल्हे यांनी आभार मानले.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

Protected Content