भुसावळात मेहुण्याचा शालकावर चाकू हल्ला

भुसावळ प्रतिनिधी । घरगुती वादातून मेहुण्याने शालकावर चाकूने वार केल्याची घटना घडली असून यातील आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

अनिस अ.मजिद (रा. किसन नगर) याच्या मामे बहिणीच्या चारित्र्यावर तिचा पती शेख सलमान संशय घेत असे. त्यामुळे शालक अनिस अ. मजिदने मेहुणा शेख सलमान याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने संशयित मेहुणा शेख सलमान याने शालक अनिस याच्या पोटावर, डोक्यावर, छातीवर आणि दंडावर चाकूने वार केले. यात अनिस जखमी झाला असून त्याच्यावर डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात संशयित मेहुणा शेख सलमानविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित शेख सलमान याला पोलीसांनी अटक केली आहे.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

Protected Content