वादग्रस्त अतिक्रमणावर महापौरांचा भल्या पहाटे ‘सर्जिकल स्ट्राईक’

जळगाव प्रतिनिधी । रस्त्यावरील रहदारीसाठी अडथळा ठरत असणारे गणेश कॉलनीतल्या ख्वाजामिया चौकातील अतिक्रमण आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हटविण्यात आले. तगड्या पोलीस बंदोबस्तासह महापौर, आयुक्त व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती झालेल्या कारवाईने या चौकाचा श्‍वास मोकळा झाला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण आज पहाटे महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे.

गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत समाजाच्या लोकांना विश्‍वासात घेऊन गुरुवारी सकाळी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी साडेपाच वाजताच महापौर सौ.भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले.

यानंतर मनपाच्या दोन कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी दुवा पठण केली. यानंतर मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नगरसेविका दीपमाला काळे यांनी गणेश कॉलनीच्या मुख्य चौकातील अतिक्रमण काढावे यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. याची दखल घेत ही कारवाई करण्यात आलेली आहे.

Protected Content