Home Cities जळगाव एकनाथराव खडसे यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

एकनाथराव खडसे यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

0
100

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावात आल्यानंतर त्यांचे रात्री उशीरा अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुंबई येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यानंतर ते शनिवारी सकाळी ९ वाजता मुंबई येथील निवासस्थानावरून जळगावला येण्यासाठी निघाले होते. त्यांचे रस्त्यात ठिकठिकाणी अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. घाटकोपर, ठाणे, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, मालेगाव, धुळे, पारोळा, एरंडोल आदी ठिकाणी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत झाले.

रात्री साडे अकराच्या सुमारास एकनाथराव खडसे हे जळगावात दाखल झाले. खोटेनगर, शिव कॉलनी, अग्रवाल चौफुली, शिवरामनगरातील मुक्ताई बंगल्यासह शहरात विविध ठिकाणी चाहत्यांनी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी व फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात खडसे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound