जळगाव जितेंद्र कोतवाल । राज्यातील ठाकरे सरकार हे संवेदनाहीन व गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. मयत कंडक्टर मनोज अनिल चौधरी यांच्या कुटुंबियांची जिल्हा रूग्णालयात भेट घेतली असतांना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
थकीत वेतनाला कंटाळून आज जळगाव आगारातील मनोज अनिल चौधरी या वाहकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी या कुटुंबाची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. महाजन म्हणाले की, राज्यातील ठाकरे सरकार हे संवेदनाहीन व गेंड्याच्या कातडीचे आहे. यात शिवसेना ही फक्त मराठी लोकांच्या नावाने राजकारण करते. प्रत्यक्षात मात्र मराठी लोकांच्या हिताचे काम केले जात नाही. एस.टी. कर्मचार्यांनी अतिशय खडतर परिस्थितीत काम केले असतांनाही त्यांना वेतन मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त करून आ. महाजन यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली.
दरम्यान, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पीक विम्यात शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. तर अद्यापही नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकार शेतकर्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे टीकास्त्र आ. गिरीश महाजन यांनी सोडले.
खालील व्हिडीओत पहा आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/508992935887325/videos/3487636091330245