जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मका पिकाची नोंदणी सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
शेतकर्यांचा मका १५ दिवसात बाजारात येणार आहे. हा मका येण्यापूर्वीच खाजगी बाजारात मक्याचे दर पाडले जाण्याची भिती आहे. हे दर स्थिर रहावे यासाठी शासनाने मका खरेदीच्या हालचाली सुरू केल्या पाहिजे. केंद्र सुरू करण्यास विलंब होणार असेल तर किमान शेतकर्यांकडून मका नोंदणी २ ऑक्टोबरपासून त्वरित सुरू करण्यात यावी. मका प्रमाणेच कापूस खरेदीची प्रक्रिया देखील सुरू करण्याची मागणी अॅड. रवींद्र पाटील यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले असून ही मागणी त्वरित पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.