Home क्राईम देवेंद्र नगरात भरदिवसा घरफोडी ; ६६ हजारांचे दागिने चोरीला

देवेंद्र नगरात भरदिवसा घरफोडी ; ६६ हजारांचे दागिने चोरीला

0
141

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचा उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या देवेंद्र नगर परिसरातील ‘प्रभुस्पर्श’ अपार्टमेंटमधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६६ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रीतम प्रल्हाद साळुंखे (वय ४०) हे व्यवसायाने इन्शुरन्स एजंट असून ते कुटुंबासह देवेंद्र नगर भागात राहतात. १६ मार्च रोजी साळुंखे हे घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी कपाटातून सोन्याचे दागिने, सोन्याची चैन आणि सोन्याच्या वाट्या असे एकुण ६६ हजार ७५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound