खा. पाटील यांनी घेतली रेल्वे बोर्डच्या चेअरमनची भेट; विविध मागण्यांबाबत चर्चा

जळगाव प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांनी रेल्वे बोर्डचे चेअरमन सुनीत शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यात प्रामुख्याने मतदारसंघातील समस्यांसह अप्रेंटीस भरती या मुद्यांचा समावेश होता.

माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणार्‍या भुसावळ ते मुंबई पॅसेंजर भुसावळ ते इगतपुरी शटल, धुळे चाळीसगाव तसेच पाचोरा जामनेर पिजे गाडी सोबत अजमेर आणि ओखापुरी एक्स्प्रेस गाड्यांना तातडीने थांबा देण्यात यावा त्याचप्रमाणे क्लास डी कर्मचार्‍यांना रोल वर घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सूनीत शर्मा यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्या कोरोना परिस्थितीतून पुर्ण क्षमतेने रेल्वे दळणवळण सूरू होताच मार्गी लावतो. असे रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांनी आश्वासीत केले आहे.

लोकसभेचे अधिवेशनाच्या दरम्यान खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना भेटून मतदार संघातील समस्यांबाबत निवेदन दिले होते. या अनुषंगाने रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांची खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भेट घेतली. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वेच्या क्लास डी कर्मचार्‍यांना रोल वर घेण्यात यावे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेले पाचशेपेक्षा अधिक परीक्षार्थी भरतीची वाट पाहत असून त्यांच्या भरती बाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या अप्रेंटिसशिप करणार्‍या उमेदवारांना रेल्वे मध्ये भरती करून घेण्यात येत नसून ती तातडीने भरती सुरू करावी. अशा आशयाची मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सुनीत शर्मा यांच्याकडे केली.

यासोबत खासदार पाटील यांनी भुसावळ ते नाशिक मेमू ट्रेन तातडीने सुरू करावी अशी मागणी केली. या संदर्भातली चाचणी पूर्ण झाली असल्याने ही गाडी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नेहमीच्या प्रवाशी गाडी सुरू करण्यासंदर्भात आदेशित करावे अशी मागणी देखील त्यांनी केली. याचबरोबर जळगाव रेल्वे स्टेशन वर लावण्यात आलेले सरकता जिना अर्थात एक्सेलेटर प्रमाणेच चाळीसगाव व पाचोरा येथे एक्सलेटर लावण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना सुविधा देणार्‍या रेल्वेगाड्या सुरू करून मतदारसंघातल्या रेल्वे संदर्भातल्या मागण्या आणि रेल्वे गाड्या तातडीने सुरू व्हाव्यात अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे बोर्ड चेअरमन सुमित शर्मा यांच्याकडे केली.

यावेळी कोरोनातून देश बाहेर पडत असून रेल्वेगाड्या पूर्णक्षमतेने रेल्वसेवा सुरू होईल त्यावेळेस आपण सुचवलेल्या सर्व ट्रेन सुरू करण्यासंदर्भात सुमित शर्मा यांनी खासदार उन्मेषदादा पाटील यांना आश्वासित केले.

Protected Content