दूध संघात आ. मंगेश चव्हाण यांनी रद्द केले अध्यक्षांच्या स्वाक्षरीचे धनादेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रशासक मंडळाने कारभार घेतल्यानंतर संचालक मंडळांच्या उपस्थितीत अध्यक्षांनी जारी केलेले धनादेश मुख्य प्रशासक आ. मंगेश चव्हाण यांनी रद्द करत नव्याने धनादेश जारी केले आहेत.

जिल्हा दूध संघातील वर्चस्वाचा वाद आता चिघळला आहे. राज्य सरकारने प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यानंतर संचालक मंडळ उच्च न्यायालयात गेले. मात्र कोर्टाने जैसे थे असा आदेश दिला. तर दुसर्‍या दिवशी विभागीय सहकार उपनिबंधक (दुग्ध ) यांनी प्रशासक मंडळाने कार्यभार सांभाळण्याचे पूर्ण निर्देश दिलेत. यानंतर मुख्य प्रशासक आ. मंगेश चव्हाण आणि त्यांचे सहकारी ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दुसर्‍याच दिवशी तत्कालीन अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी तब्बल सहा कोटी रुपयांच्या बिलांवर केली होती. गुरूवारी मुख्य प्रशासक आ. मंगेश चव्हाण यांनी हे धनादेश रद्द केलेत. यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वाक्षरी केलेले धनादेश काढण्यात आले आहेत. यावरून देखील आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Protected Content