पी. जी. महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रव्यापी सूक्ष्मजीवशास्त्र साक्षरता अभियान 

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  के.सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रव्यापी सूक्ष्मजीवशास्त्र साक्षरता अभियान  राबविण्यात आले.

हे अभियान महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल,सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणी मायक्रोबायोलॉजीस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन मायक्रोबायोलॉजीस्टस सोसायटीचे अध्यक्ष, प्रा.ए. एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे, प्रा. बी. एल. चौधरी, क.बा. चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, ए. टी. झांबरे विद्यालयाचे प्राचार्य प्रणिता झांबरे, आय.क्यू.ए.सी. व कार्यक्रमाचे समन्वयक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.संदीप पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटनावेळी भाषण करताना प्रा. देशमुख म्हणाले, की सूक्ष्मजीवशास्त्र साक्षरता अभियानाद्वारे राष्ट्रसेवा करण्यासाठी हा देशव्यापी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.संदीप पाटील यांनी केली. सूक्ष्मजीव हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे आणि त्यांचा मानवी आरोग्यावर व्यापक प्रभाव पडतो असे प्रतिपादन त्यांनी केले.

द्यार्थ्‍यांना सुक्ष्मजीव शास्त्रातील संधी  या विषयावर प्रा. बी. एल. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूक्ष्मजीवशास्त्र साक्षरता अभियाना साठी ए. टी, झांबरे. विद्यालयातील इयत्ता नववी  व दहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या अभियानात शाळकरी मुलांमध्ये सूक्ष्मजंतूंच्या भूमिकेविषयी जागरूकता आणण्यासाठी विविध सूक्ष्मजीव शास्त्रीय संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या, थेट प्रयोग शाळेतील प्रात्यक्षिके, भित्तीपत्रके,सूक्ष्मजीवशास्त्रातील वापरल्या जाणार्‍या विविध साहित्य व डॉक्युमेंटरी व्हिडिओ दाखवून सूक्ष्मजीव विज्ञान मनोरंजक करण्यात आले.

अभियानासाठी सूक्ष्मजीवशास्त्र  विभागातील प्रा.धनश्री पाटील, प्रा.एकता फुसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनश्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन एकता फुसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील विद्यार्थी,महाविद्यालयातील आणि ए. टी. झांबरे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

 

Protected Content