Home Uncategorized महिला राखीव मधून छाया देवकर व पूनम पाटील विजयी

महिला राखीव मधून छाया देवकर व पूनम पाटील विजयी

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महिला राखीवसाठी असणार्‍या दोन जागांमध्ये दोन्ही पॅनलला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

आज सकाळपासून जिल्हा दुध संघाची मोजणी सुरू झाली असून यात महिला राखीवमधून शेतकरी विकास पॅनलच्या पूनम प्रशांत पाटील आणि छायाताई गुलाबराव देवकर यांचा विजय झाला आहे. या माध्यमातून गुलाबराव देवकर यांच्या कुटुंबातील सदस्याने जिल्हा दुध संघात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound