जळगावात अमन एज्युकेशन सोसायटीतर्फे रक्तदान शिबीर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । अमन एज्युकेशन सोसायटी व रेडक्रॉस सोसायटीतर्फे ईद उला अझहाच्या निमित्ताने ‘रक्त कुर्बानी’ शहरातील इस्लामपुरा परिसरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीराचे उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, हाजी गफ्फार मलिक, करीम सलार, प्रतिभा शिंदे ॲड. जमिल देशपांडे, शनिपेठ पोलीस स्टेशनचे विठ्ठल ससे, अजीज सलार, ॲड. अकिल इस्माईल, सचिन धांडे, रईस बागवान, जमील शेख आदी उपस्थित होते. रक्तदानाचे खूप महत्व आहे. आता कोवीड रूग्णांना खूप गरज आहे. अशावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन हे कौतूकास्पद आहे असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम
अमन एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष शाहीद सैय्यद, युवा विंगचे अध्यक्ष साहिल सैय्यद, शेठ शफाक, अहेमद शेख, सैय्यद हसन, सैय्यद समिर, शेख तंजील, अहमद खान, अरबाज खान, साहिल खान, इर्शान अली, तान्वीर मनीयार, शोएब कुरेशी, अमीर खान, शोएब खान यांनी पिरीश्रम घेतले. यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. भरत गायकवाड, पंकज गायकवाड, दिपक पाटील, संजना इंगळे, सुरज पाटील, विवेक महाजन यांनी रक्तसंकलनाचे काम केले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.