‘मविप्र’ प्रकरणात अटकसत्राची तक्रार आणि एलसीबी पीआय रोहम यांची बदली

 

49411156 1685304704904864 3433676188210429952 n

 

जळगाव प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची दुपारी तडकाफडकी निवडणूक कक्षात बदली करण्यात आली आहे. मविप्र वाद प्रकरणी काही दिवसापूर्वी झालेल्या अटकसत्राचे ‘साईड इफेक्ट’ आज जिल्हा पोलीस दलास जाणवल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ॲड. विजय भास्कर पाटील यांना अटक केली होती. यानंतर विनोद देशमुख यांच्यासह दोघां अटक करण्यात आली होती. परंतू विजय पाटील यांची अटक एलसीबीने करणे चुकीचे असल्याची तक्रार पोलीस महासंचालक यांच्याकडे करण्यात आली होती. ही अटक जिल्हापेठ पोलीसांनी करावयास हवी होती. एवढेच नव्हे, तर ‘मविप्र’ हाणामारी प्रकरणात लावण्यात आलेले ३०७ हे कलम चुकीचे असल्याचीही तक्रार आधीच करण्यात आली होती. अचानक सुरु झालेले अटकसत्र हे राजकीय दबावापोटी झाल्याचीही तक्रार होती. या सर्व तक्रारींची दखल घेत पोलीस महासंचालकांनी गंभीररित्या घेतली. पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची बदलीचे आदेश येताच पोलीस दलात खळबळ उडाली.

 

मराठा विद्याप्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरून नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा जून 2018 मध्ये दाखल आला होता. गुन्हा दाखल होवून एक वर्ष झाले होते. तोपर्यंत जिल्हा पेठ पोलीसांनी अटक करण्याची कारवाई केली नाही. मात्र राजकीय दबावापोटी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 सप्टेंबर 2019 रोजी अॅड. विजय भास्कर पाटील (वय ५१, रा. दीक्षितवाडी) यांना अटक केली होती.

Protected Content