मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस २ वर्षाची शिक्षा व १२ हजार रुपयांचा दंड

पाचोरा, प्रतिनिधी | मोटरसायकल चोरीतील आरोपीस सोमवार, दि.३ जानेवारी रोजी पाचोरा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अजून १ महिन्याची कैद सुनावली आहे.

मोटरसायकल चोरीतील आरोपीस दि. ३ जानेवारी रोजी पाचोरा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची कैद सुनावली आहे. जामनेर तालुक्यातील जंगीपुरा येथील आरोपी गणेश बाबुलाल राजपूत याचेवर पाचोरा येथील राजेश सुरेशचंद्र कोंडवानी यांच्या फिर्यादीवरून कलम ३७९ व ३४ नुसार मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या या दाव्यात न्यायालयाचे न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी दि.३ जानेवारी रोजी निकाल देत आरोपी गणेश बाबुलाल राजपूत यास २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची कैद असा निकाल दिला असून या प्रकरणी तपासी अंमलदार म्हणून छबुलाल नागरे, कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक पाटील, केस वॉच म्हणून विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे अॅड.रमेश खंडू माने तर आरोपीतर्फे अॅड.चंदन राजपूत यांनी कामकाज पाहिले.

Protected Content