प्रेमसंबंध ठेव नाहीतर तुझा मर्डर करेल !

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या सोबत प्रेमसंबंध ठेव नाहीतर तुझा मर्डर करून टाकेल अशी धमकी शहरातील अल्पवयीन मुलीला दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तरूणाला अटक केली आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सध्या मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. शहरातील सागर दगडू पाटील हा तरूण अल्पवयीन मुलीचा पाठलाग करू लागला. मुलीची इच्छा नसतांना प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्रास देणे सुरू झाला. या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने सागर पाटील याने २७ सप्टेंबर रोजी मुलगी महाविद्यालयात असतांना भेटला. आणि म्हणाला की, “तु माझ्या सोबत प्रेमसंबध ठेवले नाही तर एक ते दीड महिन्यापुर्वी जसा दुसऱ्या मुलीचा मर्डर केला तसा तुझा मर्डर करेल व तुझे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल” अशी धमकी देवून मुलीचा हात पकडून तुला माझ्या प्रेम करावे आणि लग्न देखील करावे लागेल अशी धमकी देवून विनयभंग केला व मारहाण देखील केली.

दरम्यान, पिडीत मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांसोबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी सागर दगडू पाटील याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.

Protected Content