मोदींविषयी नकारात्मकता नाही : पंकजांचे स्पष्टीकरण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान देणारे वक्तव्य केल्यानंतर माजी मंत्री तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे लपून राहिले नाही. यातच त्यांनी आपल्या मागे जनता असेल तर मोदी देखील आपल्याला हरवू शकणार नाहीत असे केलेले वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे समर्थन देखील केले आहे.

दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे उडालेली खळबळ पाहून आज पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण करणारे ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, ”मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेबर पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या हायलाईटस आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे. सनसनीखेज बातम्यातून जमले तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच”…

आपण पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे सकारात्मकतेतून घ्यावे असे पंकजा मुंडे यांनी आवाहन केले आहे.

Protected Content