जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघनगर भागात पिसाळलेल्या कुत्रीने दहा बालकांचा चावा घेतल्याने खळबळ उडाली असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
वाघनगर परिसरातील ओम साईराम नगरात शनिवारी एका कुत्रीने धुमाकुळ घातला. पाच तासात तिने मुल ३ ते ११ वर्षे वयोगटातील बालकांचा चावा घेतला. वाघनगरातील विवेकानंद शाळेजवळील ओम साईनगरात पिसाळलेल्या कुत्र्याने अनुष्का हरिश्वर मौर्य या बालिकेला चावा घेतला. यानंतर याच कुत्र्याने परिसरातील एकूण दहा बालकांचा चावा घेतला. यातील ७ बालकांना प्रतिबंधात्मक अँटीरेबीज लस देऊन घरी सोडण्यात आले तर तीन जणांना जखमा खोल असल्याने तीन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले.
या बालकांना घेतला चावा
शहरातील वाघनगरातील सृष्टी राहुल अहिरे (वय-5) ही चिमुकली घराजवळील गेट जवळ उभी होती मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढवित जखमी केले तर अनुष्का हरिश्वर मौर्य (वय-7) ही चिमुकली गायीला पोळी देण्यासाठी गेली असता कुत्र्याने तिला चावा घेतला. तसेच आयुष्य ज्ञानेश्वर सत्रे (वय-2) हा चिमुकला घराचया कंपाऊंटमध्ये खेळत असतांना कुत्र्याने त्याचार हल्ला करीत जखमी केले. विराट किरण पाटील, हर्षल विकास सोनवणे रा. समता नगर, शिव गजानन किनगे (वय-3) याच्या पाठीला व पायाचे कुत्र्याने लचके तोडले आहे. वैभवी निलेश दंडगव्हाळ (वय-9) याच्या हाताला चावा घेतला असून तन्मय सुनिल डोळसे (वय-11) याच्या पायाला कुत्र्याने चावा घेत जखमी केले आहे. जखमींवर खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.
दरम्यान, वाघ नगरासह शहराच्या अनेक भागात पिसाळलेले कुत्रे असून महापालिकेने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.