जिल्ह्यात आज ३८ कोरोना बाधित आढळले; ८४ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोरोना अहवालात आज ३८ रूग्ण बाधित आढळून आले आहे तर ८४ रूग्ण कोरोनामुक्त झालेत. पाच तालुक्यात रूग्ण निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव ग्रामीण, अमळनेर, धरणगाव, रावेर आणि बोदवड हे तालुके निरंक आढळले असून जळगाव शहर- १२, भुसावळ-४, चोपडा-३, चोपडा-१, भडगाव-१, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-७, पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर-१ असे एकुण ३८ रूग्ण बाधित असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात आज पाच रूग्ण निरंक आढळले आहे. एकुण ५३ हजार ६६७ रूग्ण बाधित झाले असून त्यापैकी ५१ हजार ९१४ रूग्ण कोरोनामुक्त झालीत तर ४८० रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झालाय तर एकुण आकडा १ हजार २७३ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Protected Content