जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या गटातील मुले आणि मुली स्पर्धा नाशिक येथे १९ व २० फेब्रुवारीला तर १६ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड स्पर्धा २५ ते २८ फेब्रुवारी अकोला येथे होत असल्याने रविवारी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा संघांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने खुल्या गटातील मुले आणि मुली स्पर्धा नाशिक येथे १९ व २० फेब्रुवारीला तर १६ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड स्पर्धा २५ ते २८ फेब्रुवारी अकोला येथे होत असल्याने या दोन्ही स्पर्धेसाठी त्यासाठी जिल्ह्यातून चार मुले व चार मुली निवड चाचणी घेण्यात आली असून त्यात खालील चार मुले व चार मूली यांची प्रत्येकी दोन्ही गटात निवड झाली असून या निवड झालेल्या खेळाडूंना कांताई सभागृहात चषक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार तथा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, महाराष्ट्र राज्य आर्बिटर समितीचे सचिव प्रवीण ठाकरे, जिल्हा संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे व रविंद्र धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. विजयी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.