महापालिकेच्या कारवाईत प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार राधा कृष्ण मंगल कार्यालया शेजारील दुकानावर अतिक्रमण महापालिकेने कारवाई करून मोठ्या प्रमाणावर प्लास्टीक कप, पेप्सीकोला रोल, पॅकिंग रोल आदी साहित्य जप्तीची कारवाई केली.

 

राधा कृष्ण मंगल कार्यालया शेजारील के. के. भावनगर अँड सन्स या दुकानात बंदी असलेले प्लास्टिक असल्याची गुप्त माहिती प्लास्टिक बंदी अधिकारी जितेंद्र किरंगे यांना मिळाली होती. यासंदर्भात त्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना अवगत केले होते. आज सोमवार दि. २७ जून रोजी सकाळी आयुक्त डॉ. गायकवाड यांनी या दुकानाला प्रत्येक्ष भेट देवून पाहणी करून कारवाईचे आदेश दिले.  या  दुकानातून अतिक्रमण निर्मुलन, आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात बंदी असलेले प्लास्टिक कप, पेप्सीकोला रोल, पॅकिंग रोल जप्त केले. यानंतर बालाजी पॉलिमर जळगाव या शासन मान्यताप्राप्त असलेल्या कंपनीकडे कायदेशीर विल्हेवाटी करण्याकरिता प्लास्टिक कटिंगसाठी पाठवण्यात येत होते.

दरम्यान, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरातील व्यावसायिकांना प्लास्टिक बंदी अधिनियमाची माहित होवून त्यांच्यात जनजागृती व्हावी याकरिता नुकतीच व्यापाऱ्यांची बैठक महापालिकेत आयोजित केली होती. या बैठकीत व्यापाऱ्यांना बंदी असलेले प्लास्टिक कॅरीबग, कप, द्रोण आदींची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देवून अशा स्वरूपाचे प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री करू नका असे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत बंदी असलेले प्लास्टिक साठवून ठेवण्याचा प्रकार आज सोमवार दि. २७ जून रोजी उघड झाला आहे. यात जवळपास २ ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे, अतिक्रमण निर्मुलन विभाग प्रमुख संजय ठाकूर, आरोग्य अधीक्षक एल बी. धांडे, आरोग्य निरीक्षक एस. बी. भालेराव, सुपरवयझर नितीन पी. जावळे आदींच्या पथकाने केली.

Protected Content