बहुमताचा अधिकार हा विधीमंडळाचाच ! : उज्ज्वल निकम

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी आपल्या याचिकेत राज्य सरकारचा पाठींबा काढला असला तरी बहुमताचा अधिकार हा विधीमंडळाचाच असल्याचे ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे विधानसभेतील बहुमतावरूनच सरकार राहणार की जाणार ? हे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

राज्यातील सत्तेचे नाट्य आज सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून यावर अद्याप सुनावणी करण्यात आलेली नाही. दरम्यान, यात आपल्या याचिकेत एकनाथ शिंदे यांनी आपण स्वत: आणि अन्य ३८ अशा शिवसेनेच्या एकूण ३९ आमदारांनी राज्य सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. यासोबत अपक्ष मिळून सुमारे ५१ आमदारांचा पाठींबा काढण्यात आला असल्याचे राज्य सरकार अल्पमतात आले आहे. यामुळे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. यावर काय निर्णय होणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ज्येष्ठ विधीज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सरकार अल्पमतात की बहुमतात, हे ठरविण्याचा अधिकार विधिमंडळ सभागृहाचा, ते विधिमंडळ सभागृहाला कळवून सिद्ध करावे लागते. हे सुप्रीम कोर्टात सांगून उपयोग नाही. हा विषय कोर्टाच्या अखत्यारीतील नाही. अर्थातच, प्रत्यक्ष विधानसभेतच उध्दव ठाकरे यांच्या सरकारला पाठींबा आहे की नाही ? हे ठरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Protected Content