राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ घोषित

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या अंतर-जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. २५ मे पासून शिरपूर येथील मिलिटरी स्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार असून, संघाचे कर्णधारपद अंश बबन आव्हाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख यांनी शुक्रवारी २३ मे रोजी दुपारी १२ वाजता ही घोषणा केली.

जळगाव जिल्हा संघ २४ मे रोजी जळगावहून शिरपूरला रवाना होणार आहे. या युवा संघाला शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारुख शेख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, आमिर शेख, भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, तसेच निवड समिती सदस्य नितीन डेव्हिड, थॉमस डिसोझा, उदय फालक, राहील अहमद, हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, वर्षा सोनवणे, इमरान शेख, तौसिफ शेख आणि वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

निवड झालेल्या संघात खालील खेळाडूंचा समावेश आहे:
अंश बबन आव्हाड (कर्णधार), राशिद तारिक शेख, पार्थ चंद्रशेखर पाटील, आर्यन पंकज धावरे, शौंक ब्रिजेश लाहाटी, बिलाल वसीम शेख, चैतन्य स्वप्नील पाटील, अरहम आसिफ विच्छी, एकांश दीपक तिवारी, अर्णव नितीन पाटील, रेहान आझाद पटेल, पियुष दिवाकर भिरूड, एकांश रवींद्र ढाके, अम्मर शज्जाद शेख, शेजाद आरिफ खा, गुफ्रान जोहेब सय्यद, आमेर रोहन विसाव, अथर्व गजानन पाटील.

राखीव खेळाडू: अबुजार जलाल, समर सतीश चंदूध, तनुष खंबायत.
संघाचे प्रशिक्षक म्हणून नितीन डेव्हिड आणि व्यवस्थापक म्हणून वसीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याचा संघ या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचे नाव रोशन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.