सिनेट निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये वाद : शाब्दीक चकमक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटातून निवडून द्यावयाच्या मतदानाप्रसंगी दोन्ही पॅनलच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण होऊन शाब्दीक चकमक उडाल्याची घटना घडली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधर गटातून निवडून द्यावयाच्या दहा सदस्यांसाठी आज मतदान झाले. शहरातील मु.जे. महाविद्यालयातील मतदार केंद्रात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गोंधळ उडाला होता. महाविकास आघाडी उमेदवार विष्णू भंगाळे, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेद्र मराठे यांच्यासह आदी पदाधिकारी देखील मु.जे. महाविद्यालयाच्या आवारात होते. यावेळी आलेल्या मतदारांना मतदान कसे करावे यासंदर्भात बॅनेट पेपर देवून मार्गदर्शन करत होते. दरम्यान, मतदार मतदान करण्यासाठी आत गेल्यावर भाजपाचे पदाधिकारी अतुलसिंह हाडा व सागर येवले हे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी आक्षेप घेतला.

याप्रसंगी दोन्ही गटांमध्ये चांगलात शाब्दीक वाद देखील झाला. यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे कुणाच्या दाबावाखाली काम करत आहे असा सवाल करत यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया सिनेटचे उमेदवार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.

Protected Content