जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नांदगाव येथील 19 वर्षीय तरूणीला घरात कोणीही नसतांना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागल्याने जागीची मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिकणारी ममता बलदेव पाटील (वय-19) रा. नांदगाव ता.जि.जळगाव हिने हरतालिकेची पुजा असल्यामुळे सकाळी लवकर आंघोळ करून तयारी करत होती. त्यावेळी तिचे वडील बलदेव किशोर पाटील आणि आई वंदना बलदेव पाटील हे शेतात कामाला गेले होते तर दोन्ही भाऊ घराच्या बाहेर होती. हरतालिकेच्या पुजेसाठी तयारी सुरू असतांना सकाळी 10 वाजेच्या सुमारास विजेचा धक्का लागल्याने खाली पडल्या. त्यानंतर चुलत बहिण धनश्री ही घरी आली त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. तातडीने गल्लीतील नातेवाईकांनी धाव घेतली व तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता. वैद्यकिय अधिकारी यांना मयत घोषीत केले. मयत तरूणीच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे. मुलीचा मयत घोषीत केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात पालकांनी एकच हंबरडा फोडला होता. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.