महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती

Bhagat Singh Koshyari governer

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली असून यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपतींनी रविवारी पाच राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले आहे. तामिळनाडूत भाजपच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. लराज मिश्र यांना राजस्थान आणि बंडारू दत्तात्रय यांना हिमाचल प्रदेशात राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले असून महाराष्ट्राची जबाबदारी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ते उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. २००१ ते २००२ पर्यंत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषविले होते. २००२ ते २००७ पर्यंत ते विरोधीपक्ष नेते होते. आणि २००८ पासून २०१४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.

Protected Content