जळगाव प्रतिनिधी । आज जिल्हा दौर्यावर असणारे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोविडग्रस्तांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधला.

राधाकृष्ण गमे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉलींगच्या सहाय्याने कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांसोबत संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी रूग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. संबंधीत रूग्ण कुठले असून त्यांना उपचार घेतांना काही अडचण तर येत नाही ना ? याबाबत त्यांनी चौकशी करून माहिती जाणून घेतली.