महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामागारांचे आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महावितरण कंपनीत कंत्राटी कामांगारांना कामावर हजर करण्यात यावे व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुर्वी धरणे आंदोलन करण्यात आले होते. १८ दिवस आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत आज बुधवारपासून कंत्राटी कामगारांनी अयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान, जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहिल असा ठाम निर्णय घेतला आहे.

महावितरण कंपनीत कंत्राटी कामगारांना ८ ते १० वर्षाचा दांडगा अनुभव असतांना ठेकेदाराने अचानकपणे कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले. त्यानंतर जळगाव महावितरण कंपनी मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्या आदेशानुसार कंत्राटी कामगारांना कामावर हजर करण्याचे आदेश दिलेले असतांना ठेकदाराकडून अद्यापपर्यंत कोणत्याही कामगाराला हजर केले नाही. दरम्यान ठेकेदाराला कंत्राटीचे काम देवून आज २९ दिवस झाले परंतू अद्यापपर्यंत कोणत्याची कंत्राटी म्हणून एकाही कामगाराची नियुक्ती करण्यात आलेली नाही. नियुक्तीचे आदेश असतांना नवीन कामगार भरती केली जात असल्याने जुन्या अनुभवी कंत्राटी कामगारांवर अन्याय केला जात आहे. या मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी बुधवार २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून अयोध्यानगरातील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

गेल्या ११ महीन्यापासुन बेरोजगार झाल्याने उपासमारीची वेळ आलेले कामगार सध्या सनदशीर शांततेच्या मार्गाने लढत आहे तरी देखील कंत्राटदार अद्याप कामावर रुज करुन घेत नाही कामगारांची सहनशीलता संपत येत आहे, आता प्राण गेला तरी चालेल परंतु कंत्राटदाराची मनमानी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रीया पॉवर फ्रंट युनियन संघटनेचे राज्य संयोजक प्रमोद ठाकुर यांनी दिली. या आमरण उपोषणात बापू कोळी, निळकंठ बाविस्कर, राजेंद्र पाटील, विजय कोळी, विनोद तायडे, रवींद्र चव्हाण, सुनील सपकाळे यांच्यासह आदी कंत्राटी कामगारांनी सहभाग घेतला होता.

Protected Content