बांधकामाचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंदनगर परिसरातील सह्याद्री अपार्टमेंटसमोर बांधकामाच्या ठिकाणाहून साहित्य चोरी करणाऱ्या दोन संशयितांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यात पोलिसांनी संशयितांनी चोरलेल्या  ५ हजारांच्या लोखंडी आसारी हस्तगत केल्या आहेत.

 

रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुशील चौधरी हे गस्तीवर असतांना त्यांना दुचाकीवरुन दोन जण आसारी घेवून जातांना दिसले. दोघांना दुचाकी व मुद्देमालासह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी बांधकाम ठिकाणचे सुपरवायझर हरिशचंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात येवून दोघांना अटक करण्यात आली होती. दोघांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Protected Content