रस्ता खोदल्याच्या कारणावरून तरूणासह परिवाराला शिवीगाळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नंदगाव गावाकडून शेताकडे जाणाचा रस्ता खोदल्याने एकाला जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गावातील १३३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याचे शेतातील पायवाट असलेल्या रस्त्यावर गावातील ग्रामस्थांनी अवजड वाहनांची ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता केला होता. दरम्यान, शेतातून गेलेल्या रस्ता हा १३ जुन रोजी सकाळी १० वाजता तरूणाने कुदळ व फावड्याने रस्ता खोदून ठेवला होता. याबाबत गावातील चंद्रभान कौतीक सोनवणे, सतिष बाबुराव धनगर, कल्पनाबाई चंद्रभान सोनवणे, सुरेखा प्रविण धनगर यांच्यासह गावातील शंभरहून अधिक ग्रामस्थांनी यांना राग येवून तरूणासह त्याच्या परिवाराला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. अखेर दिड महिन्यानंतर शनिवारी २३ जुलै रोजी तरूणाने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून  चंद्रभान कौतीक सोनवणे, सतिष बाबुराव धनगर, कल्पनाबाई चंद्रभान सोनवणे, सुरेखा प्रविण धनगर यांच्यासह गावातील १३३ जणावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा हे करीत आहे.

Protected Content