कोविड रूग्णांना भेटण्यासाठी मनाई; जाणून घ्या नवीन नियम !

जळगाव प्रतिनिधी । कोविड संसर्गाच्या पार्श्‍वभूमिवर, कोरोनाग्रस्त रूग्णांना भेटण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली असून याबाबतचे निर्देश आज जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत.

सध्या कडक निर्बंध सुरू असले तरी याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, जिल्ह्यात सर्व नियमांचे पालन करण्यात यावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांना त्यांचे आप्त भेटण्यासाठी येत असल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी रूग्णांना भेटण्याची मनाई केली आहे.

यामुळे आता कुणालाही रूग्णाला खाद्यपदार्थ द्यावयाचे असतील तर ते हॉस्पीटलमधील कर्मचार्‍यांना द्यावे लागतील. तसेच आवश्यकता भासल्यास व्हिडीओ कॉलींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाब असल्यास रूग्णांना त्यांचे नातेवाईक पीपीई किट घालून भेटू शकतात.

Protected Content