बायो मेडिकल वेस्टच्या आकारणीची चौकशी करा-गुप्ता

जळगाव प्रतिनिधी । कोविड रूग्णांच्या आप्तांकडून बायो मेडिकल वेस्टच्या नावाखाली अवास्तव आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता Deepkkumar Gupta यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

सध्या खासगी रूग्णालयांमध्ये कोविडच्या रूग्णांवर उपचार करतांना अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी होत असल्याची तक्रार केली जात आहे. यातच कोरोनावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बायो मेडिकल वेस्टच्या नावावर अव्वाच्या सव्वा पैसे वसुली केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता Deepkkumar Gupta यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे.

या तक्रारीत गुप्ता यांनी नमूद केले आहे की, जळगावात अनेक कोविड हॉस्पिटलमध्ये सर्रासपणे रुग्णांकडून रोज ५०० ते ६०० रुपये बायो वेस्ट मेडिकलच्या नावाने घेतले जात असून ५० बेडचे हॉस्पिटल असेल तर रोज सुमारे २५ हजार रुपये बायो वेस्ट मेडिकलच्या नावाने रुगणांकडून वसुली केली जात आहे. वास्तविक शासनाने जे दर ठरवून दिलेले आहेत त्यातील बेड चार्जमध्ये बायो वेस्ट मेडिकलचा खर्च समाविष्ट करावा तसे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशीही मागणी गुप्ता यांनी या तक्रारीमध्ये केली आहे.

Protected Content