जळगाव प्रतिनिधी । प्रशासकीय उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत बरे होण्याचे प्रमाण हे आता ८१.३४ टक्क्यांवर पोहचले आहे. तर आज जिल्ह्यात ४९२ पॉझिटीव्ह आढळले असले तरी ६६० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीत रूग्णांपेक्षा बरे होणार्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. आज देखील हेच चित्र दिसून आले आहे. आज जिल्ह्यात ४९२ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असले तरी आजच ६६० रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज चार रूग्णांचा मृत्यू झाला असून आजवरच्या मृत्यूंची संख्या ११६६ इतकी झाल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आजच्या रूग्णसंख्येत भुसावळात तब्बल १६९ रूग्ण आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहर-१४७; चाळीसगाव-४१ आणि जळगाव ग्रामीण-२२ रूग्ण आढळले आहेत.
उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता अमळनेर-१४; चोपडा-१२; पाचोरा-१३; भडगाव-२; धरणगाव-३; यावल-१०; एरंडोल-८; जामनेर-११; रावेर-१४; पारोळा-६; मुक्ताईनगर-१७ तर इतर जिल्ह्यातील १ असे रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत.