ऑडियन्स फॅक्टरीत कॉपरची चोरी

भुसावळ शहर पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ऑडियन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या दोन कामगारांनीच कंपनीतून कॉपरच्या प्लेटांची चोरी केल्याचा प्रकार मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील ऑडियन्स फॅक्टरीत कंत्राटीपध्तीने कामागार लावण्यात आलेले आहे. या फॅक्टरीत संशयित आरोपी मोहम्मद इजाज बब्दुल सत्तार (वय-२९, रा. मेहरूण जळगाव) आणि समीर शाह रहीम शाह (वय २२, रा. मुस्लीम कॉलनी जळगाव) हे देखील कत्राटी पध्दतीने कामावर आहेत. नेहमीप्रमाणे कामावरून घरी जात असतांना सुरक्षा रक्षक गेटवर तपासणी करत असतांना मोहम्मद सत्तार आणि समीर शाह यांनी साडेचार किलो वजनाचे कॉपर चोरून नेत असतांना आढळून आले. त्याप्रकरणी कंपनीतर्फे तुकाराम दत्तात्रय शिंगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पराग सोनवणे करीत आहे.

Protected Content