कोरोनाग्रस्तांच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्यावर बंदी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देऊ नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी सिलींडर एजन्सीधारकांना दिला आहे.

जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा व वितरण करणार्‍या खासगी कंपन्यांद्वारे संबंधित रुग्णांच्या घरी ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या एजन्सीजने रूग्णांना घरपोच सिलींडर पोहचवण्यावर बंदी घातली आहे.

जिल्ह्यात तालुका पातळीवर २ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. त्याचबरोबर जळगाव शहर मनपा क्षेत्रातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये देखील पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्या अनुषंगाने खासगीरीत्या कोविड- १९ बाधित रुग्णाकडून ऑक्सिजन सिलिंडरची मागणी झाल्यास संबंधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या कोविड केअर सेंटर, शासकीय रुग्णालयामध्ये दाखल होण्याबाबत कळवणे बंधनकारक असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content