केंद्राने सगळेच दिलेय असा गैरसमज नको, प्रत्येक माणसावर भार आहे : उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्राने जे दिले आहे ते वाटतोय. पण केंद्राने सगळेच दिले आहे, असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राची उत्तम सहकार्य आहे. केंद्राने आपल्याला फक्त तांदूळ दिले आहे. पण हे फक्त काही ठराविक लोकांसाठी आहे. ज्यांचे उत्पन्न हे ५० हजारच्या आसपास आहे. त्यांनाही काही योजना केली पाहिजे. भार सर्वांवर आहे. राज्य आणि केंद्र सरकरावर आहे. जनतेवरही भार आहे. केशरी रेशनकार्ड धारकांना ३ रुपये दराने तांदूळ आणि ८ रुपये दराने गहू देत आहोत. या युद्धा जे जे कोणी उतरुन काम करत आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. या सर्वांच्या सोबतीने आपण हे युद्ध लढत आहोत. तसेच ज्यांना योगा शक्य नाही त्यांनी हलका फुलका व्यायाम घरच्या घरी करावा… हे युद्ध जिंकायचं आहे. हे जिंकल्यानंतर मोठं युद्ध असेल अर्थव्यवस्थेचं.. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. त्यासाठी ताकद, हिंमत असायला हवी. त्यासाठी तयार राहावं,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Protected Content