गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीसमोर जमावाचा गोंधळ; १२ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात काही कामागारांचे पगाराच्या मागणीच्या कारणावरून जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील सुप्रिम कंपनी गेट समोर लॉकडाऊनचे उल्लंघन करत गोंधळ घालणाऱ्या १२ जणांवर जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश भोगीलाल शाह (वय-४८) रा. प्रताप नगर जामनेर हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. यांच्यासमोर १८ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान सुप्रीम कंपनीच्या गेटसमोर संशयित आरोपी रामदास माळी रा. पाळधी ता. जामनेर, शिवाजी पठार रा. वराडासिम ता.भुसावळ, संतोष सोनोने रा. नेरी ता. जामनेर, तुळशीराम पाटील रा. शिंगाईत ता. जामनेर, गजानन साहेबराव पाटील रा. नेरी ता. जामनेर, राहुल बनराव रेनुके रा. शेंदुर्णी ता.जामनेर, भगवान कडुबा पाटील रा. केकतनिंभोरा ता.जामनेर, रितेश इश्वर कोळी रा. केकतनिंभोरा ता. जामनेर, कुंदन भदाणे, रिजवान मन्यार, विशाल गवळी, पवन माळी यांच्यासह इतर मजूरांनी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत कंपनीच्या मुख्य गेट समोर चेहऱ्यावर मास्क न लावता रस्ता आडवून हुल्लडबाजी करून घोषणा दिल्यात. याप्रकरणी राजेश शाह यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content