कोरोना रूग्ण तीनशेच्या आत : आज २९१ बाधीत; ८०५ पेशंट झालेत बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोराना रूग्णांची संख्या उतरणीला लागली असून गत चोवीस तासांमध्ये २९१ बाधीत आढळून आले असून याच काळात तब्बल ८०५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहरासह सर्व तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ओसरू लागल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-२१, अमळनेर-९, चोपडा-१२, पाचोरा-१८, धरणगाव-१२, यावल-५, एरंडोल-१३, जामनेर-२१, रावेर-१९, पारोळा-१५, चाळीसगाव-५२, मुक्ताईनगर-१७, बोदवड-९ इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण २९१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

प्रशासनाकडून आज आलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ७२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ६८७ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content