जिल्हाधिकारी कार्यालयात राबविली स्वच्छता मोहिम

jilhadikari karyalay news

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा सुचना व‍ विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कुळकायदा तहसीलदार शरद मंडलीक, सामान्य प्रशासन तहसीलदार माणिक आहेर, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, संजय गांधी योजना तहसीलदार श्री. दळवी, जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानात उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला.

Protected Content