भाजपा कार्यालयात जळगाव शहर मतदार चेतना अभियानाच्या प्रमुखासह सदस्यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालया महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या उपस्थितीत शहर मतदार चेतना अभियानाच्या प्रमुखासह इतर सदस्यांची निवड केली आहे. अशी माहिती प्रसिध्दीप्रमुख मनोज भांडारकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

बळीराम पेठेतील भाजपा कार्यालयात भाजपा महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षेखाली जळगाव शहर मतदार चेतना अभियानाची बैठक घेण्यात आली. या अभियानाच्या प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापूरे तर युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद सपकाळे यांची निवडीची घोषणा केली. शनिवार २६ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मतदार चेतना अभियान राबविण्यात येणार आहे. यात नव मतदार नोंदणी, विदेशात असलेल्या मतदारांची नोंदणी, मतदार यादी आधारकार्ड जोडणे, दुबार किंवा मयत मतदारांचे नाव वगळणे याबाबत अभियानात राबविण्यात येणार आहे. हे अभियान शहरातील मंडळ निहाय राबविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांसह नव मतदार यांनी या अभियानाचा जास्तीत जास्त फायदा घेवून नाव नोंदवून मतदार यादी सुसूत्री करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख मनोज भांडारकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content