मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी ‘अर्धनग्न आंदोलन’ करणारा शेतकरी नजरकैद

krushna dongre

नाशिक (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक २०१९ च्या चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु ‘अर्धनग्न आंदोलन’ करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याला येवला तालुका पोलिसांनी नजरकैद केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत कृष्णा डोंगरे यांनी कुठलेही आंदोलन करू नये, म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले होते.

 

येवल्याच्या नागरसूल भागातील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या त्याचे ‘अर्धनग्न आंदोलन’ सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही निवेदन सोपवले होते. मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत, मात्र व्हिडिओ अल्बममध्ये दिसतात. त्यामुळेच आपल्याला त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी ५०० रुपये देण्यासाठी त्यांना भेटायचे होते. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याची माहिती कृष्णाने दिली आहे.

Add Comment

Protected Content