Home Cities जळगाव आगीतील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात; ११ हजारांची आर्थीक मदत

आगीतील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात; ११ हजारांची आर्थीक मदत

0
45

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांचन नगरातील भैय्याची वखार येथे एका ठिकाणी गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला मोठी आग लागली होती. या आगीत संसारोपयोगी वस्तूसह सर्व वस्तू जळून खाक झाले होते. दरम्यान, नुकसानगस्तांना मदतीचा हात म्हणून आदिवासी कोळी समाजा बहुउ्देशीय संस्थेच्या वतीने ११ हजारांची मदत करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कांचन नगर भागातील भैय्या ची वखार जवळील झोपडपट्टीत २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता  गँस घळतीमुळे  सूभाष भाऊलाल बाविस्कर यांच्या घराला आग लागली होती त्या आगीत सुभाष बाविस्कर यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा विचार करून “एक मदतीचा हात” म्हणून सुभाष बाविस्कर व महिला परिवार जणांना ११ हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात “आदिवासी कोळी समाज बहूउदे्शीय संस्था” जळगाव यांच्या तर्फे देण्यात आली.

 

त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा भारत भाऊ सपकाळे, समाज सेवक भिकन नन्नवरे, भरत महाराज सपकाळे, रोहन सोनवणे, अनिल कोळी, रवि पाटील, गोकुळ सूर्यवंशी, जितू सोनवणे, अक्षय सोनवणे, रवि कोळी, नारायण सपकाळे, मनोज सपकाळे, आनंद सपकाळे,रामचंद्र दादा तायडे, संजय बाविस्कर, रमाकांत सोनवणे, भगवान जैतकर ,समाधान नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा नन्नवरे, यावेळी मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound