जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी चालक आणि मुलांमध्ये वाद झाला. दरम्यान प्रवाशी व प्रवाश्यांनी समज देवून मुलास सोडून देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर येथून जळगाव बस स्थानकात आलेली गाडी चालक बस स्थानकात लावत असताना काही मुले स्टंटबाजी करत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते. यात एका मुलाने चाकावर चढून खिडकीच्या साह्याने बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वाहक व चालक यांच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवली. यानंतर या मुलाला त्यांनी चालत्या गाडीत चुकीच्या पद्धतीने चाढण्याबाबत विचारला त्या मुलाने चालक व वाहकाशी अरेरावी करत गाडीत आम्ही कशी चढू असे उद्धटपणाने उत्तर दिले. चालक वाहक व मुलांमध्ये चाललेल्या संभाषणामुळे तेथे गर्दी जमली होती. चालक व वाहक यांनी मुलाला त्याची वागण्याची पद्धत व त्यांनी केलेली कृती चुकीची होती हे निदर्शनास आणून दिले. त्या मुलास चालक व वाहक व प्रवाशांनी समज देऊन सोडून देण्यात आले. अशा टवाळखोर मुलांवर पोलिसांनी वचक ठेवावी अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.