जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिक्षक पात्रता परिक्षेतील घोटाळ्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नेमक्या किती बोगस शिक्षकांची भरतीय झालीय याची माहिती समोर आली असून यातील जळगाव जिल्ह्यातील मुन्नाभाई शिक्षकांचा आकडा वाचून आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण खूप गाजत असून यात आज आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, झी-२४ तास या वाहिनीने या प्रकरणी खूप मोठा गौप्यस्फोट करून गैरप्रकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नेमके किती शिक्षक कार्यरत आहेत याची यादीच जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यातल्या ७८८० बोगस शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती आधीज जाहीर केल्यानंतर आता या वाहिनीने आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच मिळविली असून यात प्रत्येक जिल्ह्यानिहाय बोगस शिक्षकांची माहिती जगासमोर मांडली आहे.
यात जळगाव जिल्ह्यात तब्बल ६१४ शिक्षक गैरमार्गाने परिक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरीला लागले असल्याचे दर्शविण्यात आले आहेत. हा आकडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे. जळगावसह धुळे आणि नाशिकमध्ये बोगस शिक्षक मोठ्या प्रमाणात असल्याचे या आकडेवारीतून दिसून आले आहे.
या आकडेवारीत प्रत्येक जिल्ह्यानुसार बोगस शिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. मुंबई दक्षिण – ४० ;मुंबई पश्चिम – ६३ मुंबई उत्तर – ६० रायगड – ४२ ठाणे – ५५७ पालघर – १७६ पुणे -३९५ अहमदनगर – १४९ सोलापूर ११७१ नाशिक – ११५४ धुळे – १००२
जळगाव ड्ढ ६१४ नंदुरबार ८०८ कोल्हापूर १२६ सातारा ५८ सांगली – १२३