गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ साजरा

जळगाव लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फोउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च MBA महाविद्यालयात आज जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा केला गेला.

महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी यावेळी सांगितले की, “ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बाजारामध्ये खरेदीच्या हक्कांबाबत ग्राहक सक्षम व्हावा यासाठी दरवर्षी जगभरात 15 मार्च हा दिवस ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.यामध्ये मूलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवरण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क यांचा समावेश आहे.”

यावेळी त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व सुद्धा थोडक्यात विशद केले. “कोणतीही वस्तू खरेदी करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या वस्तूची व्यवस्थित पारख करून घ्यावी तसेच ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगायला हवी.” असे त्यांनी यावेळी सांगत ‘आपल्या हक्कांबाबत जागरूक असले पाहिजे आणि जर आपल्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर आपण दाद कुठे व कशी मागावी’ यावर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास BBA, BCA, MBA विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पोस्टर्स, स्लोगन तयार केलेले होते. सदर कार्यक्रम हा ऑनलाइन घेतला गेला. महाविद्यालयाच्या प्रा. प्रिया फालक यांनी या कार्यक्रमाचे कामकाज बघितले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ.नीलिमा वारके, प्रा.मकरंद गोडबोले, प्रा.प्राजक्ता पाटील, प्रा.चेतन सरोदे, डॉ.अनुभूती शिंदे, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.आफ्रिन खान, प्रा.अश्विनी सोनवणे, प्रा.श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा.मिताली शिंदे, प्रा.प्रिया फालक, प्रा.चंद्रकांत डोंगरे, प्रा.दिपक दांडगे, श्री.मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content