जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध वाळू वाहतूक करणार्याच्या आरोपातून जप्त करण्यात आलेल्या २६ वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांना जप्त करून त्यांच्या मालकांना दंड ठोठावण्यात येत असतो. या अनुषंगाने जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करीत असताना २२ ट्रॅक्टर्स व २ डंपर तहसील कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेले आहेत. या वाहनमालकांविरुद्ध ३३ लाख ४० हजार २६१ रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. दंडात्मक कारवाईच्या आदेशानुसार वाहनमालकांनी रक्कम शासनजमा केलेली नाही. त्यामुळे ती वाहने जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र नमुना ३ कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी जप्त वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
याच्या अंतर्गत एम.एच.१९ बी.जी.७६९०, एम.एच.१९ बी.जी.१०५३, एम.एच.४१ जी.६३३७, एम.एच.१० ए. ९७३०, एम.एच.१८ बी.७६८६, एम.एच.१९ए.एच.५२५०, एम.एच.१९ ए.एन.४६७०, क्यूएसीएल ४०६०६००२९४७, एम.एच.३७ एफ ०३२१, एम.एच.१९ बी.जी.५०१८, एम.एच.१९सी.व्ही.५४६४, एम.एच.१९ए.एन.९६१४, एम.एच.२८ बी. ७९६१, एम.एच.१९ वाय १५५३, एमबीएनएव्ही ५३ एसीकेएन४२२३५, एम.एच.१९ पी २४४४, जी.जे.३४ टी १७६९, एमबीएनएव्ही ५३ एसीकेए २१६३१, एम.एच.१९ ए.पी.९९६०, एम.एच.१९ आय ४७९६, डब्ल्यूक्यूए ४०६०६१२३७७०, एम.एच.१९ ए.पी.८१५९, एम.एच.१९ बी.एम.७०७०, एम.एच.०४ जी.एफ ८६८६ या या क्रमांकांच्या वाहनांना लिलाव करण्यात येणार आहे.
या लिलावासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मूल्यांकन केले. त्यानुसार २६ वाहनांची मूल्यांकन रक्कम ४५ लाख ७५ हजार रुपये आली आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निश्चित केलेले वाहनाचे मूल्यांकन किंवा प्रलंबित दंडाची थकबाकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल ती हातची किंमत म्हणून धरण्यात येणार आहे.