चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील पाटणा रोड परिसरात राहणाऱ्या एका इसमाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पाटणा रोड परिसरात राहणाऱ्या धर्मराज शिवराज आगोणे (वय-४२) यांचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत असून वैद्यकीय अधिकारी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना तुकाराम चव्हाण हे करीत आहे.