तरूणाच्या दुचाकीची चोरी

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणपती नगरातून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश छबु दाभाडे (वय-३५) रा. महाबळ, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास योगेश दाभाडे हा तरुण त्याची दुचाकी (एमएच १९ बीके ६२६९) ने गणपती नगरातील काळजी कॉटेज हॉटेलच्या मागे असलेल्या रतन चांडक अँड कंपनीच्या गेट बाहेर आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने ही १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची समोर आले आहे. योगेश दाभाडे याने त्याची दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला.

परंतु कुठेही तू चाकी न मिळून आल्याने त्यांनी अखेर रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Protected Content