दिल्लीत आयएसआयचा अतिरेकी पकडला

 

नवी दिल्ली वृत्तसेवा । दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्पेशल सेल टीम ही मोठी कारवाई करत आहे. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती.

अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते.

त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

Protected Content